सैफ अली खानपूर्वी अमृताचे सिंग ‘या’ क्रिकेटपटूसाठी झाली होती पागल 

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंग तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते परंतु ती बहुतेक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाब सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी ती माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री आणि बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत नात्यात होती. इतकंच नाही तर दोन्ही वेळेस अमृताची चर्चा लग्नापर्यंत पोहोचली पण तिने 1991 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. पण अमृताने लग्नानंतरही चित्रपटात काम करावे असे रवीला वाटत  नव्हते. त्याचवेळी अमृता या अटीवर क्रिकेटरशी लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यानंतर अमृता सिंगच्या आयुष्यात विनोद खन्नाची एन्ट्री झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार,एका  चित्रपटात एकत्र काम करताना दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. त्यावेळी विनोद खन्ना यांचे लग्न झाले होते आणि ते अमृतापेक्षा खूप मोठे होते.

अमृता सिंगच्या आईला तिच्या मुलीची विनोद खन्नासोबतची जवळीक आवडली नाही. दोघांच्या लग्नाला तिचा विरोध होता. असे म्हटले जाते की अभिनेत्रीच्या आईने तिच्या राजकीय संबंधांचा वापर करून विनोद खन्ना यांना अमृता सिंगच्या आयुष्यापासून दूर केले. 1991 मध्ये अमृता सिंगने सैफ अली खानसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दोघांचा धर्म वेगळा होता आणि त्याचवेळी अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. लग्नानंतर सैफ आणि अमृता सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांचे पालक झाले. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताने 2004 मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.