सुप्रिया सुळेंच्या विरोधात केलेल्या तटकरेंच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून समाचार

Jitendra Awhad Slams Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बद्दल तटकरे यांनी असे म्हटलं की, मी क्षुद्र असल्यामुळे माझ्यावर सुप्रिया सुळे टीका करत आहे. परंतु सुनील तटकरे यांनी वक्तव्य करताना त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघितलं असतं तर बरं झालं असतं कारण तुमच्या जीवनात तुम्हाला आत्तापर्यंत जी पद मिळाली आहे. ती चांगल्या घराण्यांना देखील मिळालेली नाहीत. आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शब्दामुळेच बनवलं गेलं असेही जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की , तुम्हाला मंत्री पद, पुतण्या, मुलगा, भाऊ या सगळ्यांना आमदारकी आणि त्यानंतर तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला पालकमंत्री पद देखील दिल. इतकं होऊनही तुमचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणावर मी विरोध केला. परंतु त्यावेळी तुम्ही मला विरोध करून माझं वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता. मी क्षुद्र आहे. हे नेहमी बोलतो कारण मला माझ्या क्षुद्र असण्याचा अभिमान आहे. कारण आपण पाहिलं तर क्षुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे जातीनिहाय जनगणनेसाठी क्षुद्र यांच्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल तुम्ही कधी न वापरलेले शस्त्र आता वापरायला नको होतं. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आवड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी सुनील तटकरे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली शरद पवार साहेब यांनी स्वतः मला सांगितलं आहे. की सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला… भाजपकडे चला… असं म्हणत असत असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की , मी पुरंदरे यांच्या बाबतीत कधीच चुकलो नाही ते पुस्तक वर्णन अवस्थेच्या वर अवलंबून होते तुम्ही पुरंदरे यांची बाजू नेहमी घेतली तुमचा जीआर काय कामाचा ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. जाट, गुजर ही दोन आंदोलने झाली मराठ्यांना तुम्ही नुसती आश्वासन देत असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले..

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं खरा अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज आहे. त्यांनी सांगितलं की वंचित समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे.

गावच्या सीमे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं, कारण आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. आज जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून देखील जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, खरंच कुणबी प्रमाणपत्र असेल तर ते त्यांना मिळालंच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात ३२९ जाती आहेत. सर्व जाती आपल्याला माहिती नाही. भामटा राजपूत नावाची जात देखील महाराष्ट्रात आहे आणि ती किती जणांना माहिती असेल ? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित यावेळी केला आहे.

शिंदे समितीत निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक सरकार करून करण्यात आली आहे त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, मला आश्चर्य वाटतं आंदोलन शांत करण्यासाठी सरकार नाही तर न्यायाधीश जातात. कारण पाहायला गेलं तर न्यायाधीश निष्पक्ष असावा तो कोणाचीही बाजू घेणारा नसावा न्यायाधीशाच जागतिक मत असावं. कोर्ट रूम मध्ये जाताना त्यांनी एकही पेपर वाचलेला नसावा असा जागतिक नियम आहे. आंदोलन शांत करण्यासाठी दोन निवृत्त न्यायाधीश यांचं जाणं हे त्यांच्या धर्माला शोभणार नाही असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं की बीडमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं मराठा आंदोलन आंदोलनावेळी बीडमध्ये आमदारांची घरे जाळण्याचा प्रकार जे काही घडलं तो व्यक्ती दोष असून जातीय दोष नाही ज्याची घरे जाळली ते स्वतः देखील माध्यमांसमोर येऊन स्पष्ट सांगत आहेत की हा दोष कोणाचा आहे. आणि हा प्रकार कोणामुळे घडला आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट – मंत्री छगन भुजबळ

इच्छुकांनो होशियार : आगामी महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर!

शाकिब अल हसनच्या कृतीवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला- आज जे काही झालं ते…