#BigBreaking : भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन, 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar health update) याचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.

खरतर लतादीदींच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात होत्या, मात्र अखेर मंगेशकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनियाही झाला होता.

गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यांनी अन्नग्रहणही सुरू केले होते. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत असताना आज ही दुखद बातमी समोर आली. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत.