Brajesh Pathak – सर्वसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले

Brajesh Pathak – आजवर सरकार दिल्ली आणि मुंबईतून चालायचे. परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या की नाही हे कधी विचारले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदा योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत पोहचल्या की नाही याची काळजी घेतली. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी रचना केली. गरीब कल्याणच्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून सर्व सामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले, असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) यांनी व्यक्त केले.

पाठक म्हणाले, ही निवडणूक अद्भुत आहे. 2019 मध्ये विरोधीपक्ष एकत्र येऊन मोदींना थांबवायचा प्रयत्न करतील. पण मोदींनी मोठा विजय मिळविला. आता देशात मोदींची हवा आहे. त्यामुळे जगभरातील नेते म्हणतात येणार तर मोदीच.

2014 पूर्वी देशात मोठा भ्रष्टाचाराची प्रकरणे झाली. भ्रष्टाचारी नेते तुरुंगात होते. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत होता. मोदींनी भारताला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. गरीब कल्याणच्या योजना राबविल्या. गरिबांना घरे दिली, शौचालय उपलब्ध करून दिली. गरिबांचे प्रश्न मोदींनी समजून घेतले महात्मा गांधीच्या नावाने काँग्रेसने सरकार बनविली पण स्वच्छता अभियान कधी राबविले नाही. ते मोदींनी केले. जलजीवन मिशन राबवून मोदींनी घरोघर पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. नवयुवक कौशल्य विकास कार्यक्रम दिले. देशभर सौभाग्य योजनेतून गरिबांना वीज उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान द्वारे मुख्य प्रवाहात आणले. शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला. सावकाराच्या पाशातून मुक्त केले. महिलांसाठी लखपती दीदी योजना राबविली.

गरिबांना आजारपणात आयुष्मान भारत योजना लागू केली. त्यांना सन्मानाने जगण्याची गॅरंटी दिली. पथारी धारकांना विना जामीन कर्ज दिले. बदलत्या भारताची जगाने नोंद घेतली आहे. राम मंदिर बनविले, 370 कलम हटवले, कोरोना लसीकरण देशात केले पण जगाला ही लस पुरवली. मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक कायदा केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणले. महिलांना आरक्षण दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पाठक पुढे म्हणाले, मोदींनी सर्वच क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे विरोधकांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पडावी. पुणे लोकसभा एकतर्फी भाजप विजय मिळवेल असा विश्वास वाटतो. आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आज पुणे क्लस्टरमधील पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे अध्यक्ष स्थानी होते.

प्रदेश सरचिटणीस आणि निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष आणि क्लस्टर समन्वयक राजेश पांडे, प्रभारी माधव भांडारी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळे, मकरंद देशपांडे, संयोजक श्रीनाथ भिमाले, मकरंद देशपांडे, जगदीश मुळीक, सुनील देवधर, वर्षा डहाळे, बापू पठारे, हेमंत रासने, राजू शिळीमकर, पुनीत जोशी, रवी साळेगावकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, करण मिसाळ, हर्षदा फरांदे, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, आगामी निवडणुकीच्या तयारीची महाबैठक आहे. तीन मतदारसंघाचे क्लस्टर केले. देशभर क्लस्टर मध्ये बैठका आहेत. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून लोकसभेत विजय मिळवू. त्यासाठी सर्वांना खूप कष्ट करावे लागतील. वातावरण सकारात्मक आहे. देशात मोदींना पर्याय नाही. क श्रेणीतील बूथ वर मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल.

सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या विकासासाठी केलेल्या योजनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचायचे आवाहन शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शंभर दिवस पक्षाच्या कामासाठी द्यावेत असे आवाहन पांडे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव