पतीच्या कमी पगारामुळे पत्नी नाराज, रात्री दारू पिऊन उचलले हे पाऊल

जयपूर : राजस्थानमधील बाडमेरमध्ये पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटना बाडमेर येथील जातियो येथील नवीन वस्तीची आहे. प्राथमिक तपासात पत्नीचे नाव मंजू असल्याचे समोर आले असून ती पतीच्या कमी पगारावर नाराज होती. पैशावरून पत्नीचे पतीसोबत अनेकदा भांडण होत असे यातूनच ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोतवालीचे एसएचओ उगम राज सोनी यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा दोघांमध्ये पैशांवरून जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान पत्नीच्या हातात बेल्ट लागला. तिचा गळा आवळून पतीची हत्या केली.

महिलेचा पती अनिल (३४) हा मजूर होता. पोलिसांनी असेही सांगितले की, ‘अनिल आणि मंजू (३०) दारूचे सेवन करायचे आणि आपसात भांडण करायचे. पतीच्या कमी पगारामुळे मंजू नाराज होती. यातूनच मंगळवारी सायंकाळी मंजूने अनिलचा गळा आवळला आणि त्याचा मृत्यू झाला.