तुळजापूर : आगीची ज्वाला अंगावर वाहुन नेणारा भेंडोळी सोहळा उत्साहात साजरा

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत अश्विन अमावस्येच्या सायंकाळी आगीची ज्वाला अंगावरून वाहून नेला जाणारा थरारक असा भेंडुळी उत्सव (bhendoli sohala) आई राजा उदो कालभैरव टोलभैरवाचा चांगभलेच्या गजरात संभळाचा कडकडाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला.

काल श्रीतुळजाभवानी मातेस पहाटे प्रथम अभ्यंगस्नान घालण्यात येवून नंतर भाविकांच्या पंचामृत अभिषेक पुजा करण्यात आल्या नंतर देविजीस वस्ञोलंकार घालुन धुपारती करण्यात आली. यावेळी दिवसभर भाविकांनी देविदर्शनार्थ मोठी गर्दी केली होती.

या पार्श्वभूमीवर डोंगर कड्यावर असणाऱ्या श्रीकाल भैरवास सकाळी तेलाचे अभिषेक करण्यात आले नंतर दुपारी भेंडुळी तयार करण्यात आली, सांयकाळी कालभैरव पुजारी श्रीतुळजाभवानी मंदीराचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे यांच्या उपस्थितीत देविचा पोताने भेंडुळी प्रज्वलित करण्यात आली.

या नंतर ही पेटलेली भेंडुळी युवकांनी खांद्यावर घेवून कालभैरव मंदीरातून कड्यावरील पायऱ्या उतरत मठाजवळ येताच येथे महंत हमरोजीबुवागुरुचिलोजीबुवा व महंत वाकोजीबुवागुरुतुकोजीबुवा यांनी प्रथम भेंडुळी वर तेल ओतुन पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. नंतर अन्नपूर्णा मठा समोरील असणाऱ्या सवा फुट अडचणीचा बोळातून सहजपणे शिवाजी दरवाजा मार्गे आई तुळजाभवानी मंदीरातील सिंह गाभाऱ्यात नेवुन तेथे प्रदक्षणा मारुन भवानीशंकर मंडपातुन मंदीर बाहेर आणण्यात आल्यानंतर. मंदीरातील श्रीदत्तमंदीर समोर महंत मावजीनाथ महाराज या भेंडुळी चे विधीवत पुजन करुन मनोभावे दर्शन घेतले.

त्यानंतर राजे शहाजी महाद्वारातून रोड मार्ग कमानवेस भागातील डुल्या मारुती मंदिरात आल्यानंतर येथे.मंदिराच्या पारावर अहिल्यादेवी होळकर विहीरीतील पाण्याने ही भेंडोळी शांत (विझवली) केली जाते. त्यानंतर देविजींना दहीदुधपंचामृत अभिषेक करण्यात आले.