ATS : पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला

Pune – पुणे पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान कोथरूड येथे दोघांना ताब्यात घेण्यात आलं. देशविघातक कृत्याचा संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. नाकाबंदीदरम्यान संशयितांचा तिसरा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. त्याचा कोंढवा परिसरातील घरात शोध घेण्यात आला असून लॅपटॅाप, कुऱ्हाड ताब्यात घेण्यात आली आहे.

या लॅपटॅापमध्ये देशविघातक कृत्यांसंदर्भात काही माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. मध्य प्रदेशातील काही देशविधातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचाही संशय आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

संबंधित तीनही संशयित आरोपी हे पुण्यातील कोंडवा परिसरात वास्तव्यास आहेत. पण ते कोथरुडमध्ये सारखे ये-जा करायचे. कोथरुड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातून एटीएस आणि कोथरुड पोलीस यांनी संयुक्त विद्यमाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी एकजण फरार झाला. तर दोघांना ताब्यात घेण्यात आलं.