मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते वारंवार बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार असा दावाच नारायण राणेंनी केला आहे.
राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.
माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU