बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत; कशी आहे तब्येत?

Pune: मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी पुढे येत आहे. बिग बॉस फेम (Big Boss) अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांच्या गाडीला आज पुण्यात अपघात (Abhijit Bichukale Accident) झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्यांना उपचारानंतर घरी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. या अपघातावेळी अभिजित यांच्याबरोबरच त्यांचे चार मित्रही जखमी झाले असल्याचे समजत आहे.

मुळचे साताऱ्याचे रहिवासी असलेले बिचुकले पेढ्याच्या व्यवयासामुळे पुण्यात राहतात. कामानिमित्त ते रोज पुण्यात फिरत असतात. असेच पुण्यात चार मित्रांसह आपल्या गाडीने प्रवास करत असताना बिचुकले यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला. तसेच त्यांच्या चार मित्रांनाही किरकोळ दुखापती झाल्या. त्यानंतर सर्वांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडले.

अपघातानंतर आणि उपचारानंतर अभिजित बिचुकलेने आपल्या चाहत्यांना माझी तब्येत (Abhijit Bichukale Heath) स्थिर असून काळजीचं कारण नसल्याचं सांगितलंय. डोक्याला मार किरकोळ लागलाय. त्यातून लगोलग सावरेल, अशी पहिली प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना बोलताना दिलीये. मात्र अद्याप हा अपघात नेमका झाला कसा?, याचे कारण पुढे आलेले नाही.