जेपी नड्डा यांच्यासोबत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचे ७ तासांचे विचारमंथन; जाणून घ्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

BJP General Secretaries Meeting: 2023 मध्ये अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी (10 जानेवारी) दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांशी सुमारे सात तास बैठक घेतली.

सूत्रांनी सांगितले की,  2024 च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, बूथ मजबूत करणे, वरिष्ठ नेत्यांचा लोकसभा स्थलांतर कार्यक्रम आणि भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-20 परिषदेशी लोकांना जोडण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

नड्डा यांच्याशिवाय राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष, सुनील बन्सल, अरुण सिंग, तरुण चुघ, दुष्यंत गौतम, सीटी रवी, विनोद तावडे आणि डी पुरंदेश्वरी (BL Santosh, Sunil Bansal, Arun Singh, Tarun Chugh, Dushyant Gautam, CT Ravi, Vinod Tawde and D Purandeshwari) यांनी भाजपच्या मुख्यालयात या मॅरेथॉन बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौदान सिंगही उपस्थित होते.

मिझोराम आणि त्रिपुरामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत विशेष चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 16-17 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या तयारीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. 2023 मध्ये त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये (Tripura, Nagaland, Meghalaya, Karnataka, Mizoram, Chhattisgarh, Rajasthan, Madhya Pradesh and Telangana) विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढणार?(JP Nadda’s tenure will be extended?) 
पक्षप्रमुख म्हणून नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे.