R Ashwin | धोनी विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो, मग रोहित हार्दिकच्या नेतृत्त्वात का खेळू शकत नाही?

R Ashwin Supports Hardik Pandya | ऑफस्पिनर आर अश्विनने आयपीएल 2024 मध्ये मुंबईचे नेतृत्व करताना अपयशी ठरलेल्या हार्दिक पंड्याचा बचाव केला आहे. आर अश्विनने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आर अश्विनने सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीचे उदाहरण दिले आणि स्पष्ट केले की जेव्हा सचिन तेंडुलकर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळू शकतो तर रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली का नाही?

आर अश्विन (R Ashwin) म्हणाला, “मला हे समजत नाही की जर तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल आणि त्याचा अपमान झाला असेल तर त्यासाठी कोणत्याही संघाला स्पष्टीकरण देण्याची काय गरज आहे. आपण असे वागतो की, असे कधीच घडले नाही. सौरव गांगुलीही सचिन तेंडुलकरच्या हाताखाली खेळला आहे आणि सचिन तेंडुलकरही सौरव गांगुलीच्या हाताखाली खेळला आहे. तो राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.”

अश्विन पुढे म्हणाला, “ते तिघेही अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत आणि ते सर्व धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. जेव्हा हे सर्व दिग्गज धोनीच्या नेतृत्वाखाली खेळू शकतात. धोनी विराटच्या नेतृत्वाखाली खेळू शकतो. मग यात अडचण काय आहे? तुम्ही जो रूट आणि जॅक क्रॉलीच्या चाहत्यांना इतर कोणत्याही देशात आपापसात भांडताना पाहिले आहे का? हा वेडेपणा आहे. ऑस्ट्रेलियातील चाहत्यांना स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांच्यावर भांडताना तुम्ही कधीही पाहिले नसेल.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल