खोट बोल पण रेटून बोल हेच भाजपचे ब्रीद वाक्य – यशोमती ठाकूर

बुलढाणा : अच्छे दिनच्या बात मारणाऱ्या सरकारने महागाईने कळस गाठलाय, खोट बोल पण रेटून बोल हेच ब्रीद असलेल्या भाजपच्या राजकारणाला कंटाळून अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथेही भाजपात काम करणाऱ्या काही स्वाभिमानी लोकांनी जुलुमाना कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा आनंद असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. त्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.

यावेळी भाजपच्या पदाधिकारी चिखली नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे पती कुणाल बोंद्रे जिल्हा परिषद सदस्य शैलाताई श्याम पठाडे, नगर परिषद पाणीपुरवठा सभापती गोपाल देवढे, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर रीत्या प्रवेश केलाय.

अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी मदत जमा करण्याचा निर्णय काल झाला असल्याची माहिती देखील राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री योशोमती ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.