IND vs AUS World Cup Final: पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो वर्ल्ड कप, ‘हे’ आहे कारण

Pat Cummins World Cup 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषक २०२३चा अंतिम सामना सुरू (World Cup Final) आहे. या सामन्यात यजमान संघ संघर्ष करताना दिसला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयाचे एक समीकरण पुढे येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा संघासाठी नशीबवान ठरू शकतो. त्याच्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलिया संघ वनडे विश्वचषक जिंकू शकतो. यामागचे कारण जाणून घेऊया?

अंतिम सामना जिंकत भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे विश्वचषकावर नाव कोरू शकतो. परंतु ऑस्ट्रेलियाच्या दावेदारीवरही दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. त्यातही कर्णधार पॅट कमिन्समुळे ऑस्ट्रेलियाचे नशीब फळफळू शकते. कमिन्स लग्नाच्या एक वर्षानंतर कर्णधार म्हणून विश्वचषक खेळायला मैदानात उतरला आहे. त्याने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्याची प्रेयसी बेकी बॉस्टनसोबत लग्नगाठ बांधली होती. क्रिकेटच्या इतिहासात असे काही कर्णधार आहेैत, ज्यांनी लग्नाच्या एक वर्षानंतर विश्वचषक जिंकले आहेत. या यादीत कमिन्सही सहभागी होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने २००२ मध्ये लग्न केले होते, ज्यानंतर त्याच्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीनेही लग्नाच्या एक वर्षानंतर वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. २०१० मध्ये धोनी लग्नबंधनात अडकला होता, ज्यानंतर त्याने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता. इंग्लंडचा माजी कर्णधारही या यादीत आहे. त्याने २०१८ मध्ये लग्न केले होते, ज्याच्या एक वर्षानंतर त्याने इंग्लंडला विश्वविजेता बनवले.

महत्वाच्या बातम्या-

 

You May Also Like