Pervez Musharraf Death: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईत  घेतला अखेरचा श्वास 

Pervez Musharraf Death: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, प्रदीर्घ आजारानंतर जनरल मुशर्रफ यांनी रविवारी दुबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर दुबईतील एका अमेरिकन रुग्णालयात दीर्घकाळ उपचार सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुशर्रफ एमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होते. ते 79 वर्षांचे होते. मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला गेले होते, तेव्हापासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. प्रदीर्घ आजारपणात ते अनेकदा व्हेंटिलेटरवर होते.

मुशर्रफ अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, परवेझ मुशर्रफ यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला होता त्यात त्यांना चालताही येत नसल्याचे दिसून आले. ते पूर्णपणे व्हीलचेअरवर होते.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी  झाला होता. 19 एप्रिल 1961 रोजी त्यांना पाकिस्तान मिलिटरी अकादमी काकुलमधून कमिशन मिळाले होते. परवेझ मुशर्रफ यांना 1998 मध्ये जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यांनी लष्करप्रमुख (COAS) म्हणून पदभार स्वीकारला.