#Breaking : भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ हल्ला

मुंबई – शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेला शिंगावर घेणारे  भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ (Kalanagar signal)  हा हल्ला करण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिली आणि तिकडे धाव घेतली. कंबोज यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी शिवसैनिकांना आवरले. दरम्यान, कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप  करत शिवसेना कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ( mohit-kambojs-car-attacked-near-matoshree)

मातोश्रीबाहेरील रस्त्यावरून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांची गाडी ओळखली आणि त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. कंबोज आता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात येत आहे.