‘गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती, महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार’

मुंबई – राज्यात सध्या भोंगे आणि त्याबरोबर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) जोरात चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना अमरावतीचे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आज खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडले. उद्या मातोश्रीवर ( Matoshri ) जाऊन ते  हनुमान चालिसा पठण करणार आहेत असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

रवी राणा म्हणाले,  100 धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आहोत, बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जंयती दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

दरम्यान, रोज सकाळी पत्रकार परिषदा घेण्याचा छंद असणाऱ्या खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांच्यावर नवनीत राणा यांनी यावेळी टीका केली. संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात ( Goa ) शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक ( Shiv Sainik ) आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत. असं त्या म्हणाल्या.