Breaking : सिंचन घोटाळ्यासंबंधी अजितदादांना दिलेली क्लीन चिट दोन वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित

मुंबई –   एकीकडे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरुन राजकिय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाबतची आणखी एक मोठी माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटचा रिपोर्ट अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार,  परमबीर सिंह यांनी अजित पवारांना ही क्लीन चिट दिली होती. मात्र तो अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारलेला नाही, असे समोर आले आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे अजित पवारांविरोधात सिंचन घोटाळ्याप्रकरणी टांगती तलवार कायम आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच एक ट्वीट करुन सिंचन घोटाळ्याचा पुन्हा एकदा तपास व्हावा अशी मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादीचा एक नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज ही मोठी बातमी समोर आली आहे.