Breaking | शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

Sharad Mohol murder case- बहुचर्चित शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला (Ganesh marane) अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मुख्य आरोपी गणेश मारणेला नाशिक रोड येथून अटक केली.

मोहोळची त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा येथील घराजवळील गल्लीत त्याचा सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह काही जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल