Breaking :  सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशला OBC आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली

 नवी दिल्ली-  सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशला (Supreme Court upholds Madhya Pradesh)  OBC आरक्षणासह (With OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local body elections) घेण्यास परवानगी दिलीय. तसंच एका आठवड्याच्या आत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश कोर्टानं मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला ( Madhya Pradesh Election Commission) दिले आहेत.

निवडणुकांना परवानगी देताना कोर्टानं एक अट घातली आहे. हे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं असं कोर्टाने म्हटलंय. ए. एम. खानविलकर (A. M. Khanwilkar) यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. हा निर्णय शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) सरकारसाठी मोठा विजय मानला जातोय.