सदावर्तेंवर ज्या पद्धतीने महाराष्ट्रवारी करण्याची वेळ आली होती आता तीच वेळ केतकीवरही येणार ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केतकीला याप्रकरणी शनिवारी (14 मे) ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी (15 मे) तिला ठाणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता तिला न्ययालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवरील हल्ल्यानंतर विविध गुन्ह्यांप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रवारी करण्याची वेळ आली. आता तीच परिस्थिती केतकी चितळेवर ओढवण्याची शक्यता आहे.

पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. केतकीविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं तसंच पवई आणि नाशिकसह अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.