‘या’ पक्षाचा मोठा डाव, भाजपच्या पंकजा मुंडे यांना दिली थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर

भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी देशभरात भाजप वाढवण्याचं काम केलं. परंतु आज त्यांची मुलगी पंकजा यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही पंकजा मुंडे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा करु, केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील. यावर पंकजा मुंडे यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.