अजूनही वेळ गेलेली नाही, लग्न करा, आम्ही वरात काढू; लालूजींचा राहुल गांधींना गमतीशीर सल्ला

Patna: बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी भाजपविरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. बऱ्याच दिवसांनी राजद प्रमुख राजकीय बैठकीत दिसले. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही आपली बाजू मांडली. यादरम्यान लालू यादव यांनी गंमतीत राहुल गांधींना (Rahul Gandhi) लग्न करण्याचा सल्ला दिला.

लालू यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वांसमोर म्हटले की, अजूनही वेळ गेलेली नाही. लवकर लग्न करा. तुम्ही लग्न केले तर आम्ही वरात काढू. यानंतर लालू यादव यांनी राहुल गांधींना सांगितले की, फक्त दाढी वाढवू नका, लग्न करा. तुमची आई (सोनिया गांधी) म्हणत होती की, तुम्ही त्यांचे ऐकत नाही. आता तुम्हीच राहुलचे लग्न करून द्या, असे शेवटी लालू यादव पत्रकारांना म्हणाले.