बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गंगाखेडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यांना प्रमाणपत्र व बुद्ध ग्रंथ भेट देण्यात आला

गंगाखेड/विनायक आंधळे : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जात, म्हणूनच गंगाखेड (Gangakhed) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) व सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या सवंगडी कट्टा (Savangadi Katta) यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पूर्णिमेचे (Buddha Purnima) औचित्य साधून माघील तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करण्यात आले होते . बुद्ध पूर्णिमेनिमित्त 05 मे 2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत गीता मंडळ, गंगाखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सवंगडी कट्ट्याचे रमेश औसेकर यांच्या संपूर्ण कुटुंबाने रक्तदान (Blood Donation) करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. यावेळी, स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांकडून 80 युनिट मौल्यवान रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व बुद्ध ग्रंथ भेट देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीच्या टीम ने रक्त संकलन करण्याचे काम केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अतुल तुपकर, रमेश औसेकर, इंद्रजीत जाधव, मनोज न्हावेकर, सतीश सूर्यवंशी, प्रतीक राठी, रामेश्वर भोसले, गजानन महाजन, विष्णू अनावडे, ॲड. संतोष पुजारी, ॲड. गौतम आवचार, श्रीकांत डांगे, सचिन सुरवसे, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर वाईकर, सागर गोरे, रमेश जोशी,आदींनी विशेष परिश्रम घेतले.