World Cup Final: भारत जिंकला तर नागडं फिरेन; लोकप्रिय अभिनेत्रीने केली घोषणा

World Cup 2023 Final: सध्या भारतीयांमध्ये वर्ल्ड कप फिव्हर वाढत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादला पोहोचले आहेत. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला पोहोचले आहेत. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) अहमदाबादला पोहोचली आहे.

दरम्यान, तेलगू अभिनेत्री रेखा बोज (Rekha Bhoj) हिने या सामन्याबाबत एक वक्तव्य केले असून, तो आता चर्चेचा विषय बनला आहे. रेखा बोजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने टीम इंडियाला पाठींबा दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी विझाग बीचवर कपड्यांशिवाय पळेन. ऑल द बेस्ट टीम इंडिया.या वादग्रस्त पोस्ट वर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रेखा भोजच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत असून तिच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-