कोविड १९ ची लाट ओसरताच CAA लागू होणार – अमित शहा

सिलीगुडी – सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर CAA कायदा लागू केला जाईल असं अमित शहा यांनी जाहीर केलं आहे. तीन दिवस पश्चिम बंगाल (West Bengal) दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी हे विधान केलं आहे.

सिलीगुडी येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राऊंडवर (Railway Sports Ground at Siliguri) सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “बंगालच्या जनतेने सीएम ममता बॅनर्जी यांना तिसऱ्यांदा जनादेश दिला, आम्हाला वाटले की दीदी बऱ्या होतील. पण, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ममता दीदींनी असा विचार करू नये की भाजपा (BJP) प्रत्युत्तर देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला.

त्यानंतर अमित शाह यांनी सीएए बद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. टीएमसी सीएए बद्दल अफवा पसरवत आहे की त्याची अंमलबजावणी होणार नाही, परंतु मी सांगू इच्छितो की कोविड १९ ची लाट ओसरताच आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA कायदा आहे आणि राहील.असं ते म्हणाले.