Gangadhar Rao Bhange | गंगाधराव भांगे यांना वंचितकडून उमेदवारी ?

नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवार गंगाधरराव भांगे (Gangadhar Rao Bhange) यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गंगाधर भांगे यांनी शुक्रवारी नांदेड लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा नांदेड येथील विसावा पॅलेस येथे केल्यावर, शनिवारी जनता दलाचे माजी आमदार गंगाधर पटणे भांगे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले,

रविवारी भोकर येथील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दिलीप राव यांनी वंचितच्या कार्यालयात गंगाधरराव भांगे (Gangadhar Rao Bhange) यांचे स्वागत केले. ओबीसी मतदारांची एकजूट करून, ओबीसी मतदार हाच आपला अजेंडा असणार असल्याचे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते नागोराव शेंडगे यांनी सांगून गंगाधरराव भांगे यांना निवडून आणण्याचा संकल्प या वेळी जाहीर केला. यावेळी हमीद खान पठाण,एल पी वारघडे, राहुल रामपूरकर मिलिंद गायकवाड, राजू दांडगे, आशिष सोनुले, रहीम खान या मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई