२०२१ मध्ये ‘या’ धाकड कार्सने घेतला ग्राहकांचा निरोप

नवी दिल्ली : कार निर्मात्यांना दरवर्षी आपल्या लाइनअपमधून चांगले, वाईट आणि मध्यम श्रेणीच्या कार बंद कराव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की या वाहनांमध्ये मूलभूतपणे काही चूक असते. काही कारना पुरेशी मागणी मिळत नाही, तर काहींना बाजारातील बदलांचा फटका सहन करावा लागतो. ग्राहकांचा कल आता क्रॉसओवर आणि एसयूव्हीकडे वळत आहे. काहीवेळेस कंपन्या त्यांच्या नवीन मॉडेल्ससाठी जागा तयार करण्यासाठी काही मॉडेल बंद करतात. 2021 मध्ये अशाच काही अतिशय लोकप्रिय कार बंद करण्यात आल्या आहेत.

फोर्ड ईकोस्पोर्ट

ecosport

दुर्दैवाने, फोर्डच्या भारतीय बाजारातून बाहेर पडल्यामुळे फोर्ड इकोस्पोर्टला बाजारातून बाहेर जावे लागले आहे. तथापि, 2012 मध्ये प्रवेश केल्यापासून कारने चांगली कामगिरी केली होती. इकोस्पोर्ट ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फोर्ड इकोस्पोर्टमध्ये उत्तम राइड आणि शक्तिशाली इंजिन होते. पण बाजारात जवळपास 9 वर्षांनंतर, इकोस्पोर्ट बंद झाल्यानंतर, इतर कारसाठी जागा तयार करण्याची हीच ती वेळ असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.

टोयोटा यारिस

yaris

२०२१ मधील कार बाजारातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे २०२१ मध्ये टोयोटाला यारीस मागे घ्यावी लागली. प्रत्येक कार मालकाला हव्या असलेल्या वैशिष्ट्यांसह यारिस ही सर्वात विश्वासार्ह कार होती. परंतु, ही कार ग्राहकांना आकर्षित करू शकली नाही. Honda City आणि Hyundai Verna या सेडान मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत असताना, Yaris ला म्हणावी तसी संधी मिळाली नाही.

फोर्ड एंडेवर

endevhar

या यादीतील पुढचे मॉडेल पाहून आश्चर्यचकित होऊ नका. फोर्डने भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घेतल्याने त्यांना त्यांचे अनेक लोकप्रिय मॉडेल्स बंद करावे लागले. त्यापैकी एक म्हणजे फोर्डची सर्वात लोकप्रिय आणि कार मार्केट मध्ये एनेक वर्ष दादागिरी करणारी फोर्ड एंडेव्हर… या कारचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग होता. एन्डेव्हरने आपल्या मजबूत बॉडी आणि डॅशिंग लूकने अनेक लोकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. पण, दशकभरानंतर अखेर या भन्नाट कारला निरोप घ्यावा लागला.

स्कोडा रैपिड

rapid

Skoda Rapid ही कार म्हणजे किफायतशीर आणि चांगल्या कामगिरीचा उत्तम मेळ होता. या सेडानने भारतीय ग्राहकांना कमी किमतीत एक उत्तम कार देऊ केली होती. रॅपिडमध्ये ते सर्वकाही होते जे तिच्या समान किमतीच्या दुसऱ्या मॉडेलने दिले नव्हते. 109 Bhp इंजिनची क्षमता या सेगमेंटमध्ये सर्वाधिक होती.

फोर्ड फीगो

figo

फोर्ड फिगो हे खरोखरच या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली मॉडेल होते. त्याचे 1.2 लिटर चार सिलेंडर इंजिन मजबूत शक्तीसाठी वापरले जाते. या हॅचबॅकने या सेगमेंटमधील सध्याच्या आणि आगामी मॉडेल्ससाठी बेंचमार्क सेट केला आहे.

यापैकी काही कारने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटवर दीर्घकाळ राज्य केले आहे. तर, आम्हाला नक्की कळवा यामधील कोणत्या कारला तुम्ही सर्वात जास्त मिस कराल.