भाजप नेते मोहित कंबोजविरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

मुंबई – भाजप नेते मोहित कंबोजविरोधात ( Case filed against Mohit Kamboj ) गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा ( Mohit Kamboj news ) दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2011 ते 2015 या कालावधीत कंबोज यांच्या कंपनीनं इंडियन ओव्हरसिज बँकेकडून (Indian Overseas Bank) 52 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. पण ज्यासाठी ते कर्ज घेतलं होतं, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरली आणि नंतर ते कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहित कंबोज यांनी ट्वीट करून त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.