मुंबै बँक आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू!

मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Mumbai District Central Co-operative Bank) म्हणजेच मुंबै बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी (Mata Ramabai Marg Police) चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी सहकार खात्याचे विशेष लेखा परीक्षक नीलेश नाईक (Nilesh Naik) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी दाखल असलेल्या आर्थिक घोटाळय़ाबाबतच्या विविध तक्रारी आर्थिक गुन्हे विभागानेही (Department of Economic Crimes) माता रमाबाई मार्ग पोलिसांकडे वर्ग केल्या आहेत. हा घोटाळा दहा कोटींपेक्षा अधिक असल्यास हा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ पोलीसांनी सांगितले.