जालन्यातील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचे गंभीर आरोप, म्हणाले मनोज जरांगे…

Chagan Bhujbal speech on jalana Lathicharge : राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी 2 वर्षं तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती.त्यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी जरांगे पाटली यांना म्हटलंय, “हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली, आज दिवाळीतही खातो. मी कष्टाची भाकरी खातो. मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मंडल आयोगाने जेव्हा आरक्षण दिलं. तेव्हाही काही लोक कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयात नऊ जज बसले होते. माजी न्यायामूर्ती पीबी सावंतही त्यात होते. यावेळी कोर्टाने ओबीसींचा मुद्दा बरोबर असून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतर ओबीसीत 201 जातींचा समावेश केला. सुप्रीम कोर्टाच्य़ा शिक्क्यानिशी हा समावेश झाला. त्यानंतर त्याचा जीआर निघाला. हे असंच मिळालं का? कुणाचं खाताय कुणाचं खाताय… तुझं खातोय का रे…? असा सवाल भुजबळ यांनी केला.

जालन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरून देखील छगन भुजबळ यांनी राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. त्यावेळी पोलिसांचा लाठीमार झाला. पोलिसांचा लाठीमार सर्वांनी पाहिला. पण 70 पोलीस जखमी झाले. महिला पोलीसही जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व पोलीस दगडांचा मार खावून जखमी झाले. जरांगेंना उठवायला पोलीस गेले होते. त्यावेळी मी झोपलोय नंतर या, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे पोलीस गेले. याने गच्चीवरून सर्व तयारी केली होती. पोलीस जेव्हा त्यांचं उपोषण सोडवायला गेले. तेव्हा दगडांचा मारा सुरू झाला. पटापट पोलीस जमिनीवर पडले. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?; असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.