प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु – Dhananjay Munde

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु - Dhananjay Munde

मुंबई  : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली. त्याचबरोबर बैठकीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे( Agriculture Minister Dhananjay Munde)यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

पर्जन्यमान आणि पीक पेरणी :

राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी याच सुमारास 13 लाख 50 हेक्टर पेरणी झाली होती. या वर्षी 15 लाख 11 हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 26 टक्के पेरणी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Previous Post
जालन्यातील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचे गंभीर आरोप, म्हणाले मनोज जरांगे…

जालन्यातील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचे गंभीर आरोप, म्हणाले मनोज जरांगे…

Next Post
'लाठीमार झाल्यानंतर घरात झोपेलेल्या जरागेंना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी आंदोलन करण्यासाठी बसवलं'

‘लाठीमार झाल्यानंतर घरात झोपेलेल्या जरागेंना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी आंदोलन करण्यासाठी बसवलं’

Related Posts
Paral BIT Colony | आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे; शेलारांसह भाजप अनुसूचित जाती मोर्चाची मागणी

Paral BIT Colony | आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे; शेलारांसह भाजप अनुसूचित जाती मोर्चाची मागणी

मुंबई  | परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत (Paral BIT Colony) पोहचताना अनुयायी…
Read More

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्प सजावट

पुणे : फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय…
Read More
4,6,6,6,4,6...'रो' बहुत 'मारियो'! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने शेवटच्या षटकात बॅटने आणले वादळ

4,6,6,6,4,6…’रो’ बहुत ‘मारियो’! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने शेवटच्या षटकात बॅटने आणले वादळ

Romario Shepherd : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात कॅरेबियन फलंदाज रोमारियो शेफर्डने (Romario Shepherd) दिल्लीविरुद्ध कहर केला.…
Read More