‘या’ मुद्द्यावरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत  पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्याने सर्वच कामांना स्थगिती दिली जाणार नाही असं म्हटलं होतं .यानुसार बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटीलयांनी गुरुवारी मान्यता दिली. त्यात माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे .यावरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 40 टक्के निधी एकट्या बारामती तालुक्याला दिला होता. त्यात बारामतीतील रस्ते नगरपालिकेची इमारत कालव्याची कामे ,यांचा समावेश होता .बारामती २४५ कोटीच्या कामांना चंद्रकांत दादा पाटील यांनी पालकमंत्री म्हणून स्थगिती दिलेली आहे.

जिल्ह्यातील नवीन विकासाच्या दृष्टीने आवश्यक 303 कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे .5,6तारखेला त्याचे पुस्तक तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला जी खीळ बसली होती .ती आता उठली आहे. हा पहिला टप्पा 6 तारखेला आणखी 200 कोटीच्या कामांना मान्यता दिली जाणार आहे. आता लवकर मान्यता द्यावी लागणार आहे .तरच 31 मार्च आत कामे पूर्ण होतील .यात सुमारे 4300 प्रकारचे कामे आहेत .त्यात रस्ते ,समशानभूमी, शाळा इमारती ,शहरातील दलित वस्ती ,आदिवासी भागातील रस्ते, आहेत असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे.