चांदीवलीचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

Leena Shukla And Harish Shukla Joins Shivsena:- मुंबईतील चांदीवली (Chandivali) विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

लीना शुक्ला यांनी यावेळी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या कामाचा वेगामुळेच मुंबईत सध्या अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे त्यांनी कायम मुख्यमंत्रीपदावर कायम रहावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, शिवसेनेमध्ये या नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबईत झालेली विकासकामे मुंबईमध्ये झालेला बदल आज लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात सारी कामे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती होती. कोरोना होता पण तो गेल्यावर देखील ज्या पद्धतीने विकास प्रकल्पाना चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. वैयक्तिक अहंकारापोटी हे सगळे विकासप्रकल्प थांबवले गेले होते. खरं तर वैयक्तिक स्वार्थ दूर सारत राज्याचा विकास करणे ही प्रत्येक मुख्यमंत्र्याची जबाबदारी असते. मात्र त्यावेळी त्या सरकार मध्ये मी असलो तरी मला नेहमीच याबाबत कमतरता जाणवत असल्याने आम्ही त्यात बदल घडवला. मुंबईतील सगळे रस्ते पुढील दोन वर्षात खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपला दवाखान्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सेवा मिळतायत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असून इथे जगभरातून लोकं येतात. त्यामुळे हे शहर खऱ्या अर्थी सुंदर बनवण्यासाठी सुशोभीकरण कामाला विशेष महत्व देण्यात आले आहे.

आजही मुंबईतील कचरा उचलून मुंबईकरांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे कामगार कशा अवस्थेत राहतात ते पहायला मी गेलो होतो. त्यांचं राहणीमान सुधारावे, त्याना देखील पाणी, शौचालय,उत्तम रस्ते आशा सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी मुंबई मनपा आयुक्तांना निर्देश दिले.

शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून 2017साली निवडून आलेले 35 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले असल्याचे सांगितले.
कारण त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये सोयी सुविधा पाहिजेत. वॉर्डात राहणाऱ्या लोकांना विकास अपेक्षित असून विकास करायचे असेल तर सत्तेची सोबत लागते. कोरोना काळात लोक मरत होती तेव्हा काही लोकं पैसे बनवत होते. बॉडी बॅग, खिचडी सगळ्यात पैसे खाल्ले, घोटाळे केले. मात्र आता स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सगळे इथे आले आहात. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देतानाच तुम्हाला जो हवा तो विकास नक्की साध्य होईल असे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या सौ. श्रीतल म्हात्रे या देखील उपस्थित होत्या.

https://youtu.be/Uppt2Vwrn_8?si=cZDm2WUqkVX46skm

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil