सावधान ! तो परत येतोय, चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनला आता पुन्हा एकदा कोरोनाने त्यांच्याच घोडचुकीची मोठी किंमत मोजावी लागत आहे. कोरोनातून सुरु झालेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. आता परिस्थिती हळू-हळू पूर्वपदावर येत असताना चीनमधूनच जगाची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे.

चीनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चीनमध्ये नव्यानं कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झालीय. चीनमधील शेकडो विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. शाळा देखील बंद करण्यात आल्या असून कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आलाय. देशाच्या विविध भागात प्रवास करणाऱ्या वृद्ध प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा संसर्ग आढळून आलाय. चीनच्या प्रशासनानं देशांतर्गत प्रांतांच्या सीमा बंद केल्या असून काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

कोरोनाच्या नव्या लाटेमुळं स्थानिक प्रशासनानं कोरोना चाचण्याची संख्या वाढवली आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. पर्यटन स्थळ, शाळा, मनोरंजन पार्क्सच्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. चीनमधी उत्तरेतील लांझोऊ शहरातील 40 लाख नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. ज्यांना घराबाहेर पडायचंय त्यांनी कोरोना चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा