Chandrashekhar Bawankule | सावरकरांच्या अपमानाबद्दल राहुल गांधींना उद्धव ठाकरे प्रश्न विचारणार का?

Chandrashekhar Bawankule | नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय? हे आधी जाहीर करा असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें (Chandrashekhar Bawankule) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.  हिंदुत्व विसरलेल्या, काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना उत्तर द्यावेच लागेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सावरकरांच्या अपमानाबद्दल राहुल गांधींना उद्धव ठाकरे प्रश्न विचारणार का? हा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर द्या उत्तर! ‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय? हे आधी जाहीर करा‘‘,  असे आव्हान आमचे नेते आणि देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्व विसरलेल्या आणि आता काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासाठी उद्धव ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या आहेत. ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही वारंवार का करता‘‘ हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्याची हिंमत तरी उद्धव ठाकरे दाखवतील का? या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला हवी आहेत. उद्धवजी, हिंमत असेल तर द्या उत्तर!

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?