घरी बसून सोप्या पद्धतीने कढईमध्ये बनवा ‘चीज बर्स्ट पिझ्झा’, वाचा संपूर्ण रेसिपी

Homemade Pizza: आधी पोटोबा मग विठोबा… भारताच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक मोठे खवय्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गृहिणीसुद्धा रोज एखादा नवा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत घरच्यांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी नवनवीन रेसिपीची पुस्तके विकत घेणे, टीव्हीवर खाण्याचे पदार्थ बनवायला शिकवणारे कार्यक्रम पाहणे, यूट्यूबवर खाण्याच्या वेगवेगळ्या चॅनेलला फॉलो करण्याचे काम गृहिणी करतात.

पनीरची भाजी, आलू मटरची भाजी, शेव भाजी, चिकन करी अशा चमचमीत भाजींची मेजवानी बऱ्याचदा घरी असते. आता तर लोकांना फास्ट फूडची फार आवड निर्माण झाली आहे. वडा पाव, पॅटीस, भजी असे पदार्थ आवडीने खाणारा खवय्यांचा एक वेगळा वर्ग आहे. तर बर्गर, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, मोमोज असे पदार्थ खाणारा एक वेगळा वर्ग निर्माण झाला आहे. सध्याच्या तरुणाईला तर या फास्ट फूडची प्रचंड गोडी आहे. घरातील तरुण मुला-मुलींची ही आवड पुरवण्यात गृहिणीही मागे पडत नाहीत. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात चविष्ट फास्ट फूड बनवण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.

आम्हीही तुमच्यासाठी घरच्या घरी चविष्ट चीज बर्स्ट पिझ्झा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ओव्हन न वापरता भाजी बनवण्याच्या कढईत तुम्ही हा पिझ्झा बनवू शकता. ते कसे, पाहूया…

चीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारी सामग्री-
पिझ्झा बेससाठी लागणारे साहित्य
मैदा किंवा गहूचे पीठ, साखर, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग सोडा, दही, तेल
पिझ्झासाठी लागणारे इतर साहित्य
पाव किलो मीठ, बटर, चीज, पिझ्झा सॉस, शिमला मिर्ची, टोमॅटो, कांदा, मका

चीज बर्स्ट पिझ्झा बनवण्याची रेसिपी- 
पिझ्झा बेस बनवण्यासाठी १०० ग्राम मैदा घ्या (मैदा नसल्यास गव्हाचे पीठही वापरू शकता). मैद्यात एक चमचा साखर आणि मीठ टाका. १/४ चमचा बेकिंग सोडा, ३/४ चमचा बेकिंग पावडर मैद्याच्या पीठात टाकावे. मग दही टाकून हे पीठ चुरावे. हलकेसे तेल टाकून पीठ मऊ होईपर्यंत चुरावे. मग पीठाचा गोळा करून चपातीप्रमाणे पिझ्झा बेस बनवावा. मग या पिझ्झा बेसला लो फ्लेमवर तव्यावर हलकेसे भाजून घ्यावे.

मग एक मोठी कढई घ्यावी आणि त्यामध्ये पाव किलो मीठ टाकावे. हे मीठ ताठ झाकून हाय फ्लेमवर गरम करून घ्यावे. मीठ गरम होईपर्यंत दुसरीकडे पिझ्झा बनवून घ्यावा. मैद्याचा पीठाचा चपातीप्रमाणे पिझ्झा बेस बनवावा. मग हा बनवलेला पिझ्झा बेस ताटलीत ठेवावा. या ताटलीला खालून बटर लावावे. मग पिझ्झा बेसवर भरपूर चीज लावावे. यावर तव्यावर भाजून घेतलेला पिझ्झा बेस ठेवावा.

मग पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावावा. तसेच तुम्ही चवीनुसार टोमॅटो सॉस व शेजवान सॉसही वापरू शकतात. मग त्यावर भरपूर मोझरेला चीज टाकावे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतात. कांदा, टोमॅटो, मका, शिमला मिरची टाकावी व पुन्हा चीज टाकावे. शेवटी पिझ्झा बेसच्या कडेला हाताने बटर लावावे.

हा पिझ्झा कढईत ठेवावा आणि त्यावर झाकण झाकावे. लक्षात ठेवा कढईत मिठाच्या वर एखादी वाटी ठेवावी व त्यावर पिझ्झाचे ताट ठेवावे. यामुळे मीठ पिझ्झावर पडत नाही व पिझ्झा खालून करपत नाही. पिझ्झा तयार झाल्यानंतर सर्व्ह करावा.

Previous Post
लाभार्थ्यांनी 'आयुष्मान भारत योजने'चा लाभ घ्या - आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे

लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ घ्या – आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे

Next Post
तोंडाचा वास किंवा श्वासाची दुर्गंधी कशी दूर करावी हे जाणून घ्या

तोंडाचा वास किंवा श्वासाची दुर्गंधी कशी दूर करावी हे जाणून घ्या

Related Posts
patole ns ncp

लिखीत करार मोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे?

मुंबई –  भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या (Bhandara, Gondia Zilla Parishad and Panchayat Samiti) अध्यक्ष आणि…
Read More

एमबीए शेतकऱ्यांची कमाल जिरेनियम शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

शेती करणे हे अतिशय जोखमीचे समजले जाते, सध्याचा बाजारभाव पाहिला तर अनेकजण म्हणतात शेती म्हणजे जुगार. कारण अनेकदा…
Read More
मांस खाल्ल्याने राज्यात भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना घडत आहेत?

मांस खाल्ल्याने राज्यात भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना घडत आहेत?

Himachal News: हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behera) यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे…
Read More