Rahul Gandhi काहीही चुकीचे बोलले नाहीत, मोदी हे जन्माने नाही तर कागदी OBC आहेत – अतुल लोंढे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे कागदी ओबीसी (OBC) आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा भाजपाने राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार व शेतकरी प्रश्नांवर करावे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सुनावले आहे.

यासंदर्भात पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने सवर्ण आहेत आणि पाच दशके ते सवर्णच होते, त्यांच्या जातीचा OBC मध्ये समावेश करण्यात आल्यानंतर त्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढले. राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी जे सांगितले त्याला दुजोरा देणारे जात प्रमापत्रण भाजपानेच दाखवून राहुल गांधींच्या विधानाला पुष्टी दिली आहे. नरेंद्र मोदींबद्दल काहीही बोलले की लगेच जात कशी येते, त्या जातीचा अपमान कसा होतो? भाजपाला जात-धर्म यापेक्षा दुसरे महत्वाचे काहीच कसे दिसत नाही? भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले त्यावेळी या महिलांच्या जातीचा अपमान झाला नाही का? शेतकऱ्यांना नक्षलवादी, खलिस्तानी, अतिरेकी म्हटले त्यावेळी या शेतकऱ्यांच्या जातीचा अपमान झाला नाही. भाजपा नेते त्यावेळी मूग गिळून गप्प का बसले होते? आपल्या स्वार्थी राजकारणासाठी जातीचा व धर्माचा वापर करण्याचे भाजपाने बंद करावे.

राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे प्रचंड मोठे समर्थन मिळत आहे, जनतेचा हा पाठिंबा पाहून भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काही मीडियांनी केलेल्या सर्वेतही भाजपाची देशभरात पिछेहाट होत असताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पराभवाच्या निराशेत सापडलेला भाजपा राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी आंदोलन करत आहे. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर भाजपाचा एकही नेता तोंड उघडत नाही. १० वर्षातील मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी तसेच गेलेली पत वाचवण्याची भाजपा धडपड करत आहे. जनता सुज्ञ आहे, काय खरे, काय खोटे हे त्यांना समजते, असेही अतुल लोंढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा