Chhagan Bhujbal | भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी, १३४ कोटी १८ निधीस मंजुरी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नांतून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३४ कोटी १८ लक्ष इतका खर्च येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक अंतर्गत निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रामा ७ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विंचूर येथे रामा क्र. २ या चौपदरी रस्त्याला मिळतो. लासलगाव येथे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या रस्त्यावर दळणवळण अधिक असल्यामुळे सतत अपघात होत असतात. त्यामुळे चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे प्रयत्न होते. त्यांच्या विशेष पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर हा ९.६०० किलोमीटर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३४ कोटी १८ लक्ष इतका खर्च येणार आहे.

लासलगाव विंचूर हा अतिशय वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने येथील रस्त्यावरून येणारे वाहतुकीचे अडथळे कमी होणार आहे. तसेच या रस्त्यावरील अपघातांना देखील आळा बसणार आहे. त्याचबरोबर लासलगाव येथून सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटर वरुन ७ मीटर होणार असल्याने या रस्त्यावरील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लगेच कामाला सुरुवात होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका