Crime News | अविनाश धनवेचा खून प्रकरणात चार जणांना अटक; समोर येतंय मोठे कारण

Crime News | मित्रांसह हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला गेलेल्या तरुणावर गोळीबार करीत कोयत्यांनी वार करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह इंदापूर पोलिसांनी केलेल्या तपासात चार जणांना अटक (Crime News) करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असलेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी वर्चस्व राखण्याच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीने हा खून केल्याचे समोर आले आहे. अविनाश बाळू धनवे (Avinash Balu Dhanve) (वय ३४, रा. आळंदी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

शिवाजी बाबुराव भेंडेकर (Shivaji Baburao Bhendekar) (वय ३५, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची), मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (Mayur aka Bala Mukesh Patole) (वय २०, रा. आंबेडकर चौक, आळंदी देवाची), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (Satish aka Sala Upendra Pande) (वय २०, रा. सोपानजाई पार्क, आळंदी देवाची), सोमनाथ विश्वंभर भत्ते (Somnath Vishwambhar Bhatte) (वय २२, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पुजा अविनाश धनवे हिने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) भादवि कायदा कलम ३०२, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, १०९, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका