Chhagan Bhujbal | सगळं देऊनही जरांगेची प्रसिद्धीची नशा संपत नाही, छगन भुजबळ यांचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील याचं नाटक अवघ्या महाराष्ट्राला कळालं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिलं, तरीही या माणसाची प्रसिद्धीची नशा काही संपत नाही, ती हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालली आहे, अशी टीका ओबीसी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

काय त्या मनोज जरांगेचं घेऊन बसलात? एका क्षणी हॉस्पिटलमध्ये असतो मग तो तिकडे आंतरवली सराटीला जातो. नंतर परत म्हणतो की माझ्या छातीत दुखू लागलं. परत चालला हॉस्पिटलला. त्याचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला लक्षात आलं आहे. आपण सगळं केलं मराठा समाजाला आरक्षण दिलं. नवी नोकरभरती आहे त्यात मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे जीआर निघाले आहेत. सगळं करुनही मनोज जरांगे ऐकत नसतील तर काय बोलणार? हे मारुतीचं शेपूट आहे ते वाढणार आहे. प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते. अस म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal

You May Also Like