IPL 2024 | भारतीय नव्हे तर विदेशी खेळाडू आहे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार, वनडे विश्वचषकही जिंकलाय

आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. संघाचा कर्णधार म्हणून हा बदल झाला आहे. हैदराबाद फ्रँचायझीने 17 व्या हंगामासाठी पॅट कमिन्सची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. कमिन्स या पदावर एडन मार्करामची जागा घेईल, ज्याने मागील हंगामात संघाची जबाबदारी स्वीकारली होती.

कमिन्सला कर्णधार बनवण्याच्या वृत्ताला सनरायझर्स हैदराबादनेच दुजोरा दिला आहे. बरं, ही बातमी आधीच चर्चेत होती की पॅट कमिन्स आयपीएल 2024  (IPL 2024) मध्ये हैदराबादचे नेतृत्व करू शकतो. तो कर्णधार म्हणून संघात मार्करामच्या जागी येऊ शकतो. त्यावर शिक्कामोर्तब करायचे बाकी होते, ते आता झाले आहे. कमिन्सला कर्णधार बनवण्याचा अर्थ असा आहे की संघात मार्करामची भूमिका आता फक्त फलंदाजाची असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कमिन्सला आयपीएलमधील कर्णधारपदाचा अनुभव नाही
सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला कर्णधार बनवले आहे, पण त्याला आयपीएलमधील कर्णधारपदाचा पूर्वीचा अनुभव नाही. कर्णधार म्हणून कमिन्सने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे, जिथे तो यशस्वी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि 2023 एकदिवसीय विश्वचषकावर कब्जा केला.

कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पॅट कमिन्सने आयपीएल 2023 मधून आपले नाव मागे घेतले होते. पण जेव्हा आयपीएल 2024 चा लिलाव झाला, तेव्हा कमिन्सनेही त्यात आपले नाव टाकले, जिथे तो 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागलेला आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार बनला आहे. यात त्याने केएल राहुलचा विक्रम मोडला आहे, ज्याला लखनऊ सुपरजायंट्सने 17 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

कमिन्स गेल्या तीन मोसमातील तिसरा कर्णधार असेल
कमिन्स हा आयपीएलच्या मागील तीन मोसमातील सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कर्णधार असेल. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 मध्ये 8 वे स्थान मिळवले. 2023 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी विल्यमसनला संघातून मुक्त करण्यात आले, त्यानंतर मार्करामकडे संघाची कमान आली. पण आयपीएल 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 14 पैकी 4 सामने जिंकले.

आयपीएलमधील ऑस्ट्रेलियन कर्णधार
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधारांचा इतिहास चांगला आहे. 2009 मध्ये, ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्स चॅम्पियन बनले. 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता. आता आयपीएल 2024 मध्ये कमिन्स हा ट्रेंड कायम ठेवू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal