Kapil Dev-Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिमने भारतीय क्रिकेटपटूंना दाखवले होते कारचे आमिष, कपिल देव यांनी असे हाकलले होते बाहेर

Kapil Dev-Dawood Ibrahim Story : भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा विश्वचषक जिंकला होता. कपिल देव हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की एकदा कपिलचा ‘डॉन’ दाऊद इब्राहिमशी सामना झाला होता. खरं तर ही गोष्ट आहे 1987 ची… शारजाहमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता. या सामन्यापूर्वी दाऊद इब्राहिम भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. पण यानंतर असे घडले की कपिल देवने दाऊद इब्राहिमचा (Kapil Dev-Dawood Ibrahim) ड्रेसिंग रूममधून पळवून लावले.

‘भारतीय संघ इथे चॅम्पियन झाला तर मी…’
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले त्यांच्या ‘I am there – Memoirs of a Cricket Administrator’ या पुस्तकात लिहितात की, “जर भारतीय संघ येथे चॅम्पियन झाला तर मी भारतातील अधिकाऱ्यांसह सर्व संघातील सदस्यांना त्यांच्या दारात टोयोटा कार भेट देईन. ” असे दाऊद इब्राहिमने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सांगितले होते. मात्र यानंतर संतापलेल्या कपिल देव यांनी लगेचच दाऊद इब्राहिमला भारतीय ड्रेसिंग रूममधून बाहेर पडण्यास सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

‘हो, मला आठवतं शारजाहमधल्या एका सामन्यादरम्यान एक व्यक्ती आमच्याकडे आली…’
याबाबत कपिल देव सांगतात, “होय, मला आठवतं की शारजाहमधल्या एका मॅचदरम्यान एक व्यक्ती आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आली होती आणि त्याला खेळाडूंशी बोलायचं होतं. पण ड्रेसिंग रूममध्ये बाहेरच्या लोकांना परवानगी नसल्यामुळे मी त्याला लगेच निघून जाण्यास सांगितले. त्याने माझे म्हणणे ऐकले आणि काहीही न बोलता ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला. माजी भारतीय कर्णधार पुढे म्हणाला की, मला नंतर कोणीतरी सांगितले की तो बॉम्बेचा स्मगलर आहे आणि त्याचे नाव दाऊद इब्राहिम आहे.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal