Chhagan Bhujbal | लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले

Chhagan Bhujbal : लोकसभा मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांचे… स्थानिक नेत्यांचे… संपर्कमंत्री आणि आमचे असलेले पालकमंत्री यांचे मनोगत दोन दिवस झालेल्या आढावा बैठकीत जाणून घेण्यात आले असून या क्षणाला देखील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले आहे. आता फायनल यादी जाहीर झाल्यावर जोमाने कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दिनांक ५ व ६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे पार पडली. या बैठकीत पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, गोंदिया – भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशीव, रायगड या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरुर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.

या आढावा बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, लोकसभा प्रचारप्रमुख व कृषीमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सर्व आमदार, माजी खासदार आदींसह पक्षाच्या सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान