Gautami Patil | गौतमी पाटीलचं ‘बापाचा बाप येतोय’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil New Song | आपले सौंदर्य आणि मदाक अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गौतमीचे ‘बापाचा बाप येतोय’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रीत पाटील ऑफिशल या यूट्यूब चॅनेलवर गौतमीचे हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या व्हिडिओला ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

गौतमीचे (Gautami Patil ) ‘बापाचा बाप येतोय’ या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला गौतमी चॉपरमधून उतरताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या डान्सचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. चाहत्यांनी गौतमीच्या या डान्स व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.