छगनराव … समता परिषदेच्या किती कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांचे नाव ‘छगन’ ठेवले?

Nashik – वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळ यांनी जातीयवादी टीका करत ते किती जातीयवादी आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ ?
“संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दाम संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांनी भुजबळांना सुनावले खडेबोल
ते म्हणाले, छगनराव, तुमचे मतभेद असू शकतात. पण नाहक अपप्रचार करू नका. ब्राह्मण समाजातील काही उदाहरणे देतो. माझे नाव शिवराय भास्करराव कुळकर्णी, पत्नीचे सई आणि मुलाचे शंभू. ( ही नावे श्रीशिवछत्रपतींना दैवत मानून ठेवली आहेत.)

अमरावतीत तपोवन स्थापणारे पहिले कुष्ठरुग्णसेवी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन, जेष्ठ संघ प्रचारक स्व. शिवरायजी तेलंग, विद्याधरजींचे पिता संभाजीराव गोखले, स्व. शिवाजीराव ओहळे परतवाडा, शिवराय अजय सामदेकर, अमरावती, शिवराय रवींद्र देशपांडे, नागपूर, शिवाजी जोशी सर, अमरावती, शिवराय प्रथमेश वानखडे ( आई पूर्वाश्रमीची रसिका अजित वडवेकर ब्राह्मण ), प्रसाद शिवाजी जोशी ( माझा ट्विटर वरचा मित्र ) वानगीदाखल एवढे पुरेसे आहे.

किती लोकांनी आणि किती समाजाने मुलींची नावे जिजाऊ किंवा सावित्री ठेवली यावरून कोण्या समाजाचे मूल्यमापन होऊ नये. लोकांनी नावे ठेवली नाहीत म्हणून त्यांना महापुरुषांविषयी आदर नसतो, असे नाही. तुमच्या माता – पित्यांनी तुमचे ‘छगन’ नाव का ठेवले ? या नावाला काही अर्थ आहे का ? असे नाव ठेवले म्हणजे ते नेमके कोणाशी निष्ठा बाळगायचे ? त्यांच्यासमोरही ज्योतिबा, लहुजी, भीमराव पर्याय असतीलच न ! बरं तुम्ही तुमच्या गोतावळ्यात किंवा भुजबळ कुटुंबात ज्योतिबा, सावित्री, भीमराव, अण्णाभाऊ, शाहू, लहुजी, मोहनदास, जवाहरलाल, ( सरस्वती तुम्हाला चालत नाही ! ) यापैकी नावं ठेवली असतील तर जरा यादी द्या. महाराष्ट्राला कळू द्या.

बरं आता समता परिषदेच्या किती कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांचे नाव ‘छगन’ ठेवले ? तुम्ही कितीही महान झाले तरी वर्तमानात आणि भविष्यात कोणीही आपल्या मुलाचे नाव छगन ठेवणार नाही. तुमचे आहे म्हणून नव्हे तर ते निरर्थक नाव आहे म्हणून.असले फालतू मापदंड वापरू नका, जरा जबाबदारीने वागा ! – नावा विषयी प्रचंड अभिमान असलेला, जातीचा गर्व नसलेला प्रामाणिक हिंदू व भारतीय शिवराय ‘कुळकर्णी’