Pune – दि. 30.09-23 रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन वर स्टेशन प्रबंधक श्री संजय कुंभार यांनी भारत इंग्लिश स्कूल शिवाजीगर मधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानाचे आयोजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छते संदर्भातील घोषवाक्ये प्रदर्शित केली तसेच पथनाट्याचे ही सादरीकरण केले.
शाळेच्या प्राचार्या उज्वला पिंगळे, उपमुख्याध्यापिका श्रीमती मनिषा हवालदार यावेळी उपस्थित होत्या शिक्षक वर्ग प्रज्ञा शुक्ल, वैजयंती जगताप, स्वाती चुलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
डी आर यू सी सी चे मेंबर श्री अजित चौगुले हे ही उपस्थित होते. त्यांनीही प्रवाशांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे कौतूक केले भरत वैद्य, सीमा करोडी, श्री खिराटकर, श्री दिनेश कांबळे ‘यांखेरीज अनेक रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार स्टेशन प्रबंधक संजय कुमार यांनी मानले.यावेळी उपस्थित 70 प्रवाशांना स्वचछता राखण्याचे आव्हान करण्यात आले.
https://www.youtube.com/shorts/6c18lnlAu7A
महत्वाच्या बातम्या-
दगडूशेठ मंडळाचा पुढाकार भविष्यात विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल- पालकमंत्री पाटील
नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा