आदित्य ठाकरे यांना स्वतःची नखे वाघनखे वाटत असतील; सेनेच्या खासदारानेच उडवली खिल्ली 

Aditya Thackeray :   छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj ) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत.

दरम्यान, लंडनहून राज्यात आणण्यात येणारी वाघनखे शिवरायांनी वापरलेली आहेत की नाही? यावरच आमदार आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत येणार असे आम्हाला सांगण्यात आले आहे. ती महाराजांची वाघनखे आहेत असा दावा केला आहे. हा आमच्या भावनांचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की ती वाघनखे छत्रपती शिवाजी माहाराजांनी वापरलेलीच आहेत का की शिवकालीन आहेत हे स्पष्ट केले पाहिजे.

विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनघं जेम्स ग्रँड डफ या इतिहासतज्ज्ञांच्या संग्रहातील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर ती महाराजांचीच असतील तर ती परत आणायलाच हवीत. आणि महाराजांचं मंदिर बांधून त्यात ती वाघनखे ठेवली गेली पाहिजेत असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे यांना स्वतःची नखे वाघनखें वाटत असतील, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांना डिवचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतीचिन्ह कोणतेही असेल त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करतील. तलवार आणि वाघ नखे दोन्ही आणणार आहोत. त्याचे स्वागत महाराष्ट्र करेल, असेही खासदार मंडलिक म्हणाले. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी वाघ नखं आणतील ती खरी असतील. आदित्य ठाकरे यांना वाघ नख्यांबद्दल काय माहिती आहे हे मला माहित नाही, त्यांना स्वत:ची नखं वाघनखं वाटत असावीत, असा टोला संजय मंडलिक यांनी लगावाला.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण