शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा प्लॅन ?

Mumbai – शिवसेनेला जोरदार झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का देऊ शकतात. राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 165 आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे 15 मिळून ही संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना 200 चा पल्ला गाठण्यासाठी आणखी 20 आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार फोडणार का याकडं लक्ष लागलंय.

काँग्रेसचे विधानसभेत 44 तर राष्ट्रवादीचे 53 सदस्य आहेत. त्यामुळे ते 20 आमदार कोणत्या पक्षाचे असतील याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधीलच काही आमदार मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आमदारही क्रॉस वोटिंग करतील का, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.