एकनाथ शिंदे यांचे अण्णा हजारे यांच्याकडून अभिनंदन; भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काहीही काम असेल तर आदेश द्या, राज्याच्या हितासाठी हे सरकार काम करीत असून त्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री   शिंदे यांनी यावेळी अण्णा हजारे यांना केले.