Jalgaon LokSabha 2024 | उन्मेष पाटील यांच्याऐवजी मित्र करण पवार यांना जळगावातून उमेदवारी, उद्धव ठाकरेंनी खेळला मोठा डाव!

Jalgaon LokSabha 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची आणखी एक यादी जाहीर केली असून जळगाव येथून करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. करण पवार यांनी भाजपाने तिकीट कापलेले खासदार उन्मेष पाटील यांच्यासोबत आज मातोश्रीवर शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना जळगावातून उमेदवारी दिली.

खरे तर, जळगावमधून (Jalgaon LokSabha 2024) ठाकरे गट उन्मेश यांना संधी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय असलेले करण पवार यांना उमेदवारी देत भाजपला धक्का दिला आहे. आता जळगाव येथे करण पवार विरुद्ध भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यात लढत पाहायला मिळेल.

करण पवार यांना उमेदवारी का?
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचा पारोळा, एरंडेल, भडगाव या तालुक्यात चांगला जनसंपर्क आहेत. करण पवारांचे काका व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचाही पाठिंबा करण पवार यांना लोकसभेसाठी मिळू शकतो. तसंच, उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचीही साथ त्यांना या निवडणुकीत मिळू शकते. याशिवाय महाविकास आघाडीतील तीन पक्षांची ताकद यामुळं करण पवार यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. भाजपमधील अंतर्गंत नाराजीचा फायदाही करण पवार यांना होऊ शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती